वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं धगधगत वादळ. एक निर्भीड आणि संघर्षमय नेतृत्व. वसंत मोरे हे पहिल्यांदा २००७ मध्ये पहिल्यांदा कात्रज प्रभागात नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर हे वादळ कधी थांबलं नाही. अन्यायाविरुद्ध नेहमीच सरकारच्या नाकर्तेपणाच्या भिंतीवर धडक देत राहिलं. आजपर्यंत त्यांनी सभागृहात वेगवेगळ्या जबाबदारी अगदी तडफदारपणे सांभाळल्या आहेत.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात वसंत मोरे यांचा जन्म झाला. आपल्या भागात आजपर्यंत राज्यकर्त्यांकडून होत असलेली जनतेची फसवणूक त्यांनी पहिली होती. हे चित्र कुठे तरी बदलले पाहिजे आणि आपणही या समाजाचे काही देणे लागतो हि कर्तव्याची भावना मनात ठेऊन त्यांनीं राजकारणात पाऊल ठेवले.
नेहमीच आपल्या नवनवीन पद्धतीने अन्यायाविरुद्धच्या आंदोलनांमुळे वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत आणि जनतेच्या मनात राहिले आहेत. त्यांच्या अशाच नि:स्वार्थ कार्यामुळे त्यांना जनतेचा नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. वसंत मोरे यांना नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुणे महानगर निवडणूक समन्वयक हि जबाबदारी मिळाली आहे. तात्यांनी केलेल्या कामाला पाठिंबा म्हणून आपण सर्वजण त्यांना भरभरून मतदान करूया आणि स्मार्ट पुण्याचा हा रांगडा नगरसेवक महापौर म्हणून पुणे महानगरपालिकेत पाठवूया आणि आपल्या पुण्याला विकासाच्या एका नवीन पर्वाचा साक्षीदार बनवूया.
अधिक जाणून घ्यावसंत मोरे यांनी आजपर्यंत आपल्या कारकिर्दीत अगणिक लोकोपयोगी विकासकामे केली आहेत. त्यातील काही ठळक विकासकामे खाली नमूद केली आहेत
आमच्या नगरसेवकांवर जर 353 दाखल करणार असाल तर पुणे मनपा आधिकाऱयांवर ही कलम 420 प्रमाणे गुन्हे दाखल झालेच पाहिजेत
होय हे काम फक्त श्री.राज ठाकरे यांचा पक्षच करू शकतो. पूना हॉस्पिटल मधील 2 मेडिकल FDA कडून 1 महिन्यासाठी निलंबित .